अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलची वैष्णवी कदम वत्कृत्वमध्ये चंदगड तालूक्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2022

अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलची वैष्णवी कदम वत्कृत्वमध्ये चंदगड तालूक्यात प्रथम

व्यत्कृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक प्राप्त कु. वैष्णवी कदम

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत चंदगड पंचायत समिती व शिक्षण विभाग यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चंदगड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज  अडकूर (ता. चंदगड) ची इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी युवराज कदम हिने प्रथम  क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे कु. वैष्णविणे आझादी का अमृत महोत्सव या विषयावर हिंदीमधून आपले विचार व्यक्त करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

        या अगोदर अडकूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री फर्नांडीस यांच्या मार्गदर्शनाखाली अडकूर केंद्रशाळेत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये ही वैष्णविने प्रथम क्रमांक मिळवला होता. या उज्वल यशाबद्दल कु. वैष्णवीचे  अभिनंदन केंद्रप्रमुख श्री फर्नांडीस, प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

No comments:

Post a Comment