बसर्गेत स्वातंत्र्याच्या अमॄत महोत्सवानिमित्त आजी-माजी सैनिकांचा सन्मान, माजीमंत्री भरमु आण्णा पाटील कुटुंबियांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2022

बसर्गेत स्वातंत्र्याच्या अमॄत महोत्सवानिमित्त आजी-माजी सैनिकांचा सन्मान, माजीमंत्री भरमु आण्णा पाटील कुटुंबियांचा पुढाकार

बसर्गे (ता. चंदगड) येथे माजी सैनिकांचा सत्कार करताना माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, बाजूला सचिन बल्लाळ,ज्योतीताई पाटील ,शिवनगेकर आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          भारतीय स्वातंत्र्याच्या अमॄत महोत्सवा निमित्त देशातील शहीद जवानांच्या पत्नीचा आजी माजी सैनिकांचा सत्कार भाजप पक्षाच्या वतीने स्थानिक पातळीवरील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावा या संकल्पनेतून माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांनी आपल्या कुटूंबियांच्या वतीने काल बसर्गे गावातील सर्व  आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

        प्रारंभी प्रास्ताविक करून अनिल शिवनगेकर यानी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.  यावेळी भरमुआण्णा म्हणाले, ``सिमेवर देशाचे  संरक्षण करणाऱ्या सैनिकांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. याचे ऋण आपण कधीच विसरू शकत नाही. म्हणून त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्या गावातील आजी माजी सैनिकांचा सत्कार करावा असे ठरविले. सैनिक सिमेवर प्रामाणिक आपले काम असल्याने आपण आरामात आपल्या कुटूबांसोबत राहू शकतो. त्यामुळे आपण त्यांचा गावागावात सन्मान करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. 

       माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ म्हणाले, ``वयाच्या ८६ व्या वर्षात भरमुआण्णाचे काम  पाहीले तर तरूणांना देखील जमणार नाही. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन स्वतः करून गावातील सैनिकांना मानसन्मान मिळवून दिला. यावेळी माजी सभापती शांताराम पाटील, गोकुळ माजी संचालक दिपकदादा पाटील, माजी महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील, सुरेश सातवणेकर, तुकाराम बेनके, वसंत चव्हाण, मारूती कुट्रे, हरिभाऊ पाटील, लक्ष्मण पाटील, नारायण पाटील, एकनाथ बसर्गेकर, निशिकांत कांबळे, सरपंच तुकाराम कांबळे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थिती होते. सुत्रसंचालन रामू पाटील यानी केले तर अनिल शिवणगेकर यांनी मानले.


No comments:

Post a Comment