जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कुर्तनवाडी (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते, कोल्हापूर जिल्हा परीट समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवस निमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर अंगणवाडी मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, राम पाटील, माजी सरपंच प्रा.प्रकाश चांदेकर, भिकाजी माडखोलकर, चेअरमन म्हातारु चांदेकर, माजी ग्रा. पं. सदस्य ह.भ.प.अशोक चांदेकर, चंदगड आगर इंटक संघटना अध्यक्ष बाळासाहेब चौकुळकर, राम चांदेकर, डॉ. अमोल चांदेकर, बबन चांदेकर, संदीप चांदेकर, सदानंद काजीर्णेकर, संकेत चांदेकर, यलाप्पा गावडे, सागर नाईक, लक्ष्मण चव्हाण, राहुल गावडे, निशांत चांदेकर, राकेश गावडे, राहुल चांदेकर, प्रथमेश कानूरकर, रामकृष्ण चांदेकर, विघ्नेश चिपकर, गौरव गावडे, शेखर पाटील आदीनी पंकज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जय हनुमान मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment