कडलगे बुद्रुक : ध्वजवंदन प्रसंगी सरपंच सुधीर गिरी व अन्य मान्यवर.
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
कडलगे बुद्रूक (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे शनिवारी दि. १३ रोजी सकाळी ७.३० वा. देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ गावातील जेष्ठ माजी सैनिक लक्ष्मण रवळू पाटील व सटूप्पा व्हळ्याप्पा कांबळे या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम साठी लोकनियुक्त सरपंच सुधीर गिरी, उपसरपंच रेश्मा पाटील सर्व सदस्य, ग्रामसेवक सुनील पुजारी, माजी सैनिक नागोजी एटले, रवळू पाटील आदी माजी सैनिक तसेच तंटामुक्त अध्यक्ष के. आर. पाटील व उपाध्यक्ष भोजू पाटील, माजी प्राचार्य ए. एस्. पाटील, सेवा सोसायटी चेअरमन मनोहर ईक्के, तानाजी पाटील, शिवाजी पाटील, शाळा समिती अध्यक्ष रोहिणी पाटील, उपाध्यक्ष दौलत पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक व अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील ग्रामस्थ, तरूण मित्र, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सदस्य एकनाथ कांबळे यांनी केले तर स्वागत सरपंच सुधीर गिरी यांनी केले.
No comments:
Post a Comment