विंझणे प्राथमिक शाळेतून श्री सरस्वती मूर्तीची चोरी, पोलिसांत तक्रार दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2022

विंझणे प्राथमिक शाळेतून श्री सरस्वती मूर्तीची चोरी, पोलिसांत तक्रार दाखल

संग्रहित छायाचित्र

चंदगड :  सी. एल. वृत्तसेवा

           विंझणे (ता. चंदगड) येथील मराठी विद्या मंदिर या प्राथमिक शाळेतील श्री सरस्वती मूर्ती काल दि. ११ रोजी चोरीला गेली आहे. याबाबतची फिर्याद मुख्याध्यापक यांनी चंदगड पोलीस ठाण्यात दिली आहे.

        प्राथमिक शाळेस ग्रामपंचायत विंझणे यांनी गतवर्षी चौदावा वित्त आयोग मधून १४ हजार रुपये किमतीची श्री सरस्वती मूर्ती भेट दिली होती. ही मूर्ती काल रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. हा प्रकार आज उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक बोलावून घडल्या प्रकाराची माहिती दिली व नंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी चंदगड पोलिसात मूर्ती चोरी झाल्याची तक्रार नोंद केली आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment