डुक्करवाडी येथे ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ, १९ ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2022

डुक्करवाडी येथे ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ, १९ ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन

ज्ञानेश्वर माऊली च्या मूर्तीची मिरवणूक काढताना ग्रामस्थ.
  

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंंदगड तालुक्यातील डुक्करवाडी (रामपूर) येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला काल  पासुन सुरुवात झाली. या निमित्त ज्ञानेश्वर माऊली च्या मूर्तीची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. ह. भ. प. पाडुरंग हरिभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व ह. भ. प.एकनाथ मारूती गावडे यांच्या अधिपत्याखाली शुक्रवार दि. १२ ते शुक्रवार दि.१९ या कालावधीत हनुमान मंदिरात या ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

           पारायण सोहळ्याचे हे बत्तीसावे वर्षे असून या सोहळ्याची मुहूर्तमेढ वै. ह. भ. प.हरिभाऊ काकडे व वै.ह.भ.प.मारुती गावडे यांनी रोवली. या पारायणाची मुहूर्तमेढ ह.भ.प.पाडुरंग घोळसे यांच्या शुभहस्ते रोवण्यात आली. गुरूवार दि.१८ ऑगस्ट रोजी रात्री ९.००वाजता हभप राणबा गावडे (आसगाव) यांचे किर्तन होणार आहे. या सप्ताहकाळात किर्तन,प्रवचन, भजन होणार आहे. यानिमित्ताने वैष्णवांची मांदियाळी होणार आहे. शुक्रवार दि १९ रोजी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.





No comments:

Post a Comment