चंदगड येथील गुरुवार पेठ परिसरातील नागरिकांना तिरंगा ध्वज देताना शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर, यावेळी प्रा डाॅ. साळुंके, डॉ. पाटील, शाखाधिकारी शिंदे आदी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या चंदगड शाखेतर्फे चंदगड शहरात 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत ध्वजांचे मोफत वितरण करणेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर 'तिरंगा' फडकवण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे . त्यानुसार उत्स्फुर्तपणे हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार चंदगड येथील बाजार पेठ, गुरुवार पेठ परिसरातील नागरिक व व्यावसायिकांना ध्वज वितरण करण्यात आले. चंदगड शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर यांच्या हस्ते ध्वज वितरण अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी चंदगड शाखा सल्लागार प्रा. डॉ. आर. एन. साळुंखे, शाखाधिकारी दिपक शिंदे, सभासद डॉ. अनिल पाटील, सचिन नेसरीकर, शांताराम भिगुर्डे, सुधीर देशपांडे आदींसह सभासद, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment