शिक्षक दिनानिमित्त 'चंदगड' मधील शिक्षकांसाठी पंचकर्म व वैद्यकीय चिकित्सा - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2022

शिक्षक दिनानिमित्त 'चंदगड' मधील शिक्षकांसाठी पंचकर्म व वैद्यकीय चिकित्सा

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त चंदगड तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींना 'माधवबाग क्लिनिक, हरी मंदिर रोड, अनगोळ- बेळगाव' यांनी पंचकर्म चिकित्सा ऑफर उपलब्ध करून दिली आहे. 

         अनेक अशैक्षणिक कामे व बदलत्या जीवनशैलीमुळे शिक्षक कमालीचे तणावग्रस्त बनले आहेत. अनेक शिक्षक व्याधीग्रस्त बनले आहेत बहुसंख्य  बनण्याच्या मार्गावर आहेत. शैक्षणिक, अशैक्षणिक कामांच्या व्यापात शिक्षकांचे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. हे ओळखून माधवबाग क्लिनिकच्या डॉ. संगीता हांजे यांनी चंदगड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षिकांसाठी ७५ टक्के सवलतीच्या दरात पंचकर्मचिकित्सा उपलब्ध करून दिली आहे.

          केवळ रुपये ६५०/- मध्ये एक पंचकर्म (स्नेहन, स्वेदन, बस्ती), तसेच इसीजी, रक्तदाब, रँडम ब्लड शुगर आदींची तपासणी व वैद्यकीय सल्ला यांचा समावेश आहे. चंदगड तालुक्यातील शिक्षकांच्या विनंतीवरून ही सवलत शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि. ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत देण्यात आली आहे. वरील कालावधीत जे शिक्षक बुकिंग करतील त्यांना ३० सप्टेंबर अखेर या सवलतीचा लाभ मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ८७७०६८४१५६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन माधवबाग च्या वतीने करण्यात आले आहे.

रोगांपासून दूर राहण्याचा रामबाण उपाय म्हणजे आपल्याला रोगच होऊ न देणे.
No comments:

Post a Comment