चिंचणे येथे सार्वजनिक विहीरीचे पाणी गढूळ, वाळू उपशाचा परिणाम - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2022

चिंचणे येथे सार्वजनिक विहीरीचे पाणी गढूळ, वाळू उपशाचा परिणाम

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        चिंचणे (ता. चंदगड) येथे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून याचे गढूळ पाणी सार्वजनिक विहीरीत उतरत असल्याने ते पूर्णत : दूषित झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
     डोंगर पायथ्याला वसलेल्या व ताम्रपर्णी नदिकाठावर असणाऱ्या चिंचणे गावच्या परिसरात प्रचंड प्रमाणात वाळू उपसा चालू आहे. याचा लाभ काही जणानाच होत असला तरी त्याचा प्रचंड त्रास मात्र शेतकरी, ग्रामस्थ व येथील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकाना होत आहे. गावामध्ये काही ताम्रपर्णी नदिवरून पाणी पुरवठा होत असला तरी अनेक जन रस्त्यालगत असणाऱ्या सार्वजनिक विहीरीतील पाणी पितात. पण या विहीरीच्या पाण्यामध्ये वाळू धूतलेले गढूळ पाणी मिसळत असल्याने विहीरीतील पाणी अत्यंत चिखलयूक्त बनत आहे. त्यामूळे हे पाणी पिण्यास अयोग्य बनले आहे. या पाण्याची ग्रामपंचायतीमार्फत तपासणी करण्यात आली आहे पण त्याचा अहवाल अद्याप ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना दिला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत मात्र यावर उपाययोजना न करता तूरटीचा वापर करण्याचा फूकटचा सल्ला ग्रामस्थांना देत आहे. यामुळे ग्रामस्थ प्रचंड वैतागले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.


No comments:

Post a Comment