चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कळसगादे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत शुक्रवारी (ता. ११) पाटणे फाटा येथील मेगा इंजिनियरिंग प्रा. लि. कंपनीच्या वतीने शाळेतील मुलांना शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ श्रीकांत दळवी यांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक साहित्य वाटप केले.
यामध्ये कंपनीकडून शाळेसाठी आवश्यक असणारे संगणक, कलर प्रिंटर, सात टेबल, तबला, ढोलकी, ताशे, ढोल यासारखे संगीत साहित्य व त्याचबरोबर खेळाचे साहित्य शाळेला भेट भेट स्वरूपात देण्यात आले.
![]() |
मेगा कंपनीच्या कर्मचाऱ्याचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करताना शालेय समिती अध्यक्ष संतोष दळवी |
अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य शाळेला मिळाल्याने शाळेच्या सांस्कृतिक आणि भौतिक गरजांची काही प्रमाणात पूर्तता झाली आहे. सदर साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळेल. त्याचबरोबर विविध तंत्र शिक्षण मिळेल. खेळाच्या साहित्यातून मुलांचा शारीरिक विकास होण्यास मदत होईल.
![]() |
मेगा इंजिनियरिंग प्रा. लि. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पुष्प देवून स्वागत करताना शालेय समिती सदस्य सुरेश दळवी |
यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय मुदगुण, प्रवीण वासनिक, सौ. कविता मुडगुण, सुरेश दळवी यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी मेगा कंपनीचे एचर आर सुभराव पाटील, महादेव पाटील, मनोज परीट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष दळवी, शिक्षणतज्ञ श्रीकांत दळवी, सदस्य सुरेश दळवी, किरण दळवी, मुख्याध्यापक व इतर शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत उत्तम भारमल यांनी केले. आभार शरद मेश्राम यांनी मानले.
No comments:
Post a Comment