माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय पाटील यांची महाराष्ट्र हिंदी प्राध्यापक परिषदेच्या मानद सदस्यपदी बहुमताने नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2025

माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय पाटील यांची महाराष्ट्र हिंदी प्राध्यापक परिषदेच्या मानद सदस्यपदी बहुमताने नियुक्ती

डॉ. संजय नारायण पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. संजय नारायण पाटील यांची महाराष्ट्र हिंदी प्राध्यापक परिषद या नामांकित परिषदेच्या मानद सदस्यपदी बहुमताने नियुक्ती झाल्याचे पत्र परिषदेचे प्रधान सचिव डॉ. गजानन चव्हाण यांनी दिले आहे.

     डॉ. संजय पाटील हे गेली 27  वर्षे येथील र. भा. माडखोलकर  महाविद्यालयात हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर ते तज्ञ अभ्यासक कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना  उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवलेल्या डॉ. संजय पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल खेडूत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक, आजी-माजी प्राचार्य  तसेच  सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment