चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
वेखंडवाडी (ता. पन्हाळा, कोल्हापूर) येथील धनश्री अमोल खोत (वय २४) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. १५) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती हॉटेल कर्मचारी अमोल खोत, सासू, सासरे, आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. धनश्री ही कुर्तनवाडी (ता. चंदगड) येथील तुकाराम चांदेकर यांची कन्या होय. त्यांचा गत फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. या घटनेमुळे कुर्तनवाडी गावावरही शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment