चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातुन जाणारा बेळगांव-वेंगुर्ला मार्गावर गेल्या काही वर्षभरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे दरवर्षी किमान ६० ते ७० निष्पाप लोकांचे नाहक बळी गेले आहेत.
हा मार्ग वर्दळीचा असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. परंतु या राज्यमार्गाची रुंदी कमी असल्याने वाहतुकीची कोंडी होते व दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.
या बेळगांव-वेंगुर्ला राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्ग करावा, जेणेकरून या मार्गाचा विकास होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर याचा चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील या रस्त्यालगतच्या गावांना व्यावसायिक दृष्ट्या मोठा फायदा होईल.
No comments:
Post a Comment