शिष्यवृती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूलची निधी पाटील तालुक्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2025

शिष्यवृती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूलची निधी पाटील तालुक्यात प्रथम

 

निधी दीपक पाटील

चंदगड: सी. एल. वृत्तसेवा

    खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री संचलित चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या शिरपेचात ऐतिहासिक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कु. निधी दीपक पाटील हिने शहरी विभागात तालुक्यात प्रथम व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

    इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये अमेय प्रदीप कुंभार, रफिया इरफान चांद हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. इयत्ता ५ वी शिष्यवृत्तीमध्ये कार्तिकी शिवकुमार जालदा, मंगेश मच्छिंद्रनाथ गुरव, प्रथम प्रल्हाद दळवी, श्रेया श्रीकांत वंजारी हे विद्यार्थ्यी पात्र ठरले आहेत. 

    सर्व यशस्वी, गुणवंत, यशवंत, किर्तीवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि पालकांचे शालेय समिती चेअरमन प्रा. एन. एस. पाटील, प्राचार्य आर. पी. पाटील यांनी केले अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment