चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
वाढती लोकसंख्या ही जरी समस्या असली तरी वाढत्या लोकसंख्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो असे मत भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. एस. मासाळ यांनी व्यक्त केले. ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
डॉ. मासाळ आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ``तरुणांना योग्य आणि आशावादी जगात त्यांना पाहिजे असलेली आदर्श कुटुंब तयार करण्यास सक्षम बनवणे हे 2025 चे घोषवाक्य आहे. युवक केवळ आपले भविष्य घडवीत नाहीत तर ते न्याय, समावेशक व शाश्वत मागणी करत असतात. वाढती लोकसंख्या ही जरी गंभीर समस्या असली तरी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला तर लोकसंख्या देशाचा विकास घडवू शकते. असेही यावेळी त्यांनी बोलताना सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.``
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल म्हणाले की, लोकसंख्या ही देशाची साधनसंपत्ती किंवा दायित्व ठरू शकते, उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी, योग्यवेळी, उपयोग झाल्यास देशांमध्ये( ब्रेन ड्रेन) बुद्धिवंतांचे वहन टाळून ब्रेन बँक अस्तित्वात येऊ शकते. त्यासाठी योग्य व्यक्तीला योग्य काम किंवा व्यक्तीची नियुक्ती योग्य कामावर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.``
प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एस. सावंत यांनी करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. के. पाटील यांनी केले. तर आभार स्टाफ सेक्रेटरी प्रा. व्ही. के. गावडे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. अरुण जाधव, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. टी. ए. कांबळे, डॉ. जी. वाय कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. शाहू गावडे, डॉ. के. एन. निकम यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment