गुरुपौर्णिमेनिमित्त रांगोळीतून रेखाटली 'गुरु रामकृष्ण परमहंस' यांची भावमुद्रा, औरवाडकर यांची कलाकृती - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2025

गुरुपौर्णिमेनिमित्त रांगोळीतून रेखाटली 'गुरु रामकृष्ण परमहंस' यांची भावमुद्रा, औरवाडकर यांची कलाकृती



कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
    गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरूंना अभिवादन म्हणून वडगाव- बेळगाव येथील रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी आज दिनांक १० जुलै २०२५ रोजी झालेल्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आपल्या रांगोळी कलेतून देशातील व जगभरातील सर्व गुरु, शिक्षकांना अभिवादन केले आहे. त्यांनी आपल्या नाझर कॅम्प येळ्ळूर रोड, वडगाव बेळगाव येथील ज्योती स्टुडिओत स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांची रांगोळीतील भावमुद्रा रेखाटली आहे. २ बाय ३ फूट आकाराच्या ही रांगोळी रेखाटण्यासाठी त्यांना तब्बल ११ तास वेळ लागला. लेक कलर मधील ही रांगोळी सर्व नागरिकांना पाहण्यासाठी १५  जुलै पर्यंत सकाळी  ९ ते रात्री ९ या कालावधीत पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे. 
   प्रत्येक दिनविशेष चे औचित्य साधून त्यांनी आत्तापर्यंत टाकलेल्या १०० पेक्षा अधिक रांगोळ्यांना रांगोळी रसिकांनी भरभरून दाद दिली आहे. त्यांच्या या कलेची दखल घेऊन नुकतेच त्यांना 'लक्षवेध कला कर्तृत्व पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment