चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन श्री भावेश्वरी विद्यालय नांदवडेचे प्र. मुख्वाध्यापक यू. एल. पवार यांनी केले. ते शालेय मंत्रीमंडळाने विद्यालयात आयोजित केलेल्या गुरूपौर्णिमा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अक्षता पाटील हिने केले.
रचना मळवीकर, स्मितल गावडे, अनुजा पाटील, सिद्धार्थ बुवा, तन्मय पेडणेकर, साईराज गावडे अध्यापक पी. एम. कांबळे, अध्यापिका सौ. एस. आर. कोरवी यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व अध्यापकांचे विद्यार्थ्यांकडून स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संजोत मळवीकर याने केले तर आभार कु. ओंकार सुतार याने मानले.
No comments:
Post a Comment