गुरूंचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ - जी. जी. वाके, विद्यार्थ्यांनी केले गुरूंचे औक्षण, 'दि न्यू इंग्लिश स्कूल'मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2025

गुरूंचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ - जी. जी. वाके, विद्यार्थ्यांनी केले गुरूंचे औक्षण, 'दि न्यू इंग्लिश स्कूल'मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        "गुरु म्हणजे अज्ञानाचा अंध:कार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. ज्या व्यक्तींनी आपल्याला वाचायला, लिहायला, बोलायला शिकवलं, त्या सर्व गुरुस्थानास पात्र ठरतात. देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान गुरुंना दिलं जातं, कारण देव प्राप्तीसाठीसुद्धा गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक असतं." असे उद्गार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ  जी. जी. वाके यांनी काढले.

      ‘दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड’ येथे पार पडलेल्या गुरूपौर्णिमा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे पाद्यपूजन व औक्षण करून पारंपरिक पद्धतीने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. एन. कांबळे यांनी केले. इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत नाव नोंदवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. निधी दिपक पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाला व्ही. के. गावडे, व्ही. एन. मोहनगेकर, बी. ए. पाटील, आर. एस. कांबळे, ओ. डी. पाटील, ए. आर. चव्हाण, आर. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभार व्ही. के. गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment