राजगोळी बुद्रुक येथे गुरुवार दि. १ रोजी रक्तदान शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2022

राजगोळी बुद्रुक येथे गुरुवार दि. १ रोजी रक्तदान शिबिरकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
         राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील आदर्श कला, क्रीडा व व्यायाम मंडळाच्या वतीने गुरुवार दि. १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्पण ब्लड बँक तसेच केदारी रेडेकर हॉस्पिटल व ब्लड स्टोरेज सेंटर गडहिंग्लज यांचे याकामी सहकार्य लाभले आहे. मराठी विद्या मंदिर राजगोळी बुद्रुक येथे  होणाऱ्या रक्तदान शिबिरात परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. आपण दिलेल्या रक्तातून  अनेकांना जीवदान मिळू शकते. कर्यात भागातील तरुणांनी यापूर्वी समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवून यशस्वी केले आहेत. तद्वत या रक्तदान शिबिर उपक्रमातही मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला आदर्श दाखवून द्यावा. असे आवाहन आदर्श मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 


No comments:

Post a Comment