अर्जुनवाडी येथे गुरूवार दि. १ रोजी मॅरेथॉन स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2022

अर्जुनवाडी येथे गुरूवार दि. १ रोजी मॅरेथॉन स्पर्धातेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            शिवप्रेमी गृप अर्जुनवाडी ( ता. गडहिंग्लज ) येथे गुरूवार दि .१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता खुला गट मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले आहे.

          १६०० मिटर होणाऱ्या या स्पर्धा शिवप्रेमी चौक अर्जुनवाडी येथून सुरू होणार असून यासाठी ८० रूपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे . यासाठी पुढील प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत . अनुक्रमे ३००१ , २००१ , १५०१ , १००१ , ७५१, ६५१ , ५०१ , ३५१ , २५१ व १०१ अशी रोख बक्षिसे व प्रत्येक विजेत्याला मेडल देण्यात येणार आहे . तरी या स्पर्धांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाक़डून करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment