शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीमुळे कुरुंदवाड शिबिराचे महत्त्व वाढले, मराठा सेवा संघाचे ११ रोजी विभागीय शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2022

शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीमुळे कुरुंदवाड शिबिराचे महत्त्व वाढले, मराठा सेवा संघाचे ११ रोजी विभागीय शिबिर


 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता शिबिर कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) येथे ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. शासकीय विश्रामगृह कसबा बावडा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठा सेवा संघ जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी ही घोषणा केली.

       शिबिरात राज्यस्तरीय नेते, प्रतिनिधी उपस्थित राहून मराठा आरक्षण, मराठा समाजाचे राज्य व केंद्र शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न, मराठा युवक- युवतींना उद्योगधंदे सुरू करताना येणाऱ्या अडचणी, आर्थिक समस्या, आदी अनेक विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करणार आहेत. मराठा सेवा संघाच्या ३२ कक्षांपैकी एक असलेल्या संभाजी ब्रिगेड पक्षाशी शिवसेनेच्या नुकत्याच झालेल्या युती मुळे कुरुंदवाड शिबिराचे महत्त्व वाढले आहे. शिबिरासाठी मराठा सेवा संघाच्या ३२ कक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा युवक, युवतींसह मराठा समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित असे आवाहन कार्यकारणी बैठकीनंतर करण्यात आले.

           स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता संजय पाटील, जलसंपदा विभाग अभियंता एस आर पाटील, अशोक खाडे, विनायक लक्ष्मण पाटील, सुशांत निकम, मानसिंग देसाई, ॲड रणजीत आरडे, सचिन भोसले, शरदचंद्र पाटील, संमोहन तज्ञ विठ्ठल कोतेकर, ॲड रणजीत आरडे, मधुकर बिरंजे, सुरेश पाटील, सतीश माने, गोवर्धन माने, सचिन भोसले, सुनील पाटील, संजय नारायण पाटील, संजय काटकर, पंडित पाटील, प्रकाश बावचे, अजय भोसले, दत्तात्रय धोंडफोडे, नेताजी बुवा, संग्राम जाधव, डी के देसाई, शाहीर परिषद प्रदेशाध्यक्ष डॉ राजीव चव्हाण, जिल्हा प्रवक्ता शहाजी देसाई आदींची उपस्थिती होती. आभार विनायक पाटील यांनी मानले. 

शिबिरास शिवसेना- संभाजी ब्रिगेड व्यक्तीची झालर

मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड पक्षाशी नुकतीच शिवसेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, मराठा सेवा संघ संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड येथील होणाऱ्या शिबिरास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेची झालेल्या युतीमुळे संभाजी ब्रिगेड अधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र दिसत आहे.



No comments:

Post a Comment