अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे उत्साळी येथे घराची भिंत कोसळून लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2022

अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे उत्साळी येथे घराची भिंत कोसळून लाखोंचे नुकसान

उत्साळी येथे रामा चौगुले यांच्या घराची पडलेली भिंत

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          अडकूर पासून जवळ असलेल्या उत्साळी (ता. चंदगड) येथे रामा बाबाजी चौगुले यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून २ लाखाचे नुकसान झाले.

     गेल्या चार दिवसापासून चंदगड तालूक्यात सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक नदयाना पुर आला असून अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर ठिकठिकाणी घरांच्या पडझडी होत आहेत आज दि. ११ रोजी सकाळी  १० वाजता रामा चौगुले यांच्या घराची भिंत कोसळली. यामध्ये या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवीत हाणी झाली नाही. प्रशासनाने याचा त्वरीत पंचनामा करून नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment