दाना केअर फाऊंडेशन मार्फत शिनोळी व सोनारवाडी येथे वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2022

दाना केअर फाऊंडेशन मार्फत शिनोळी व सोनारवाडी येथे वृक्षारोपण

 

शिनोळी येथे दाना केअर फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           शिनोळी (ता. चंदगड) येथील दाना केअर फाऊंडेशन मार्फत शिनोळी खुर्द, कार्वे, सोनारवाडी, शिनोळी बुद्रुक येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध जातींची झाडे लावण्यात आली.

       दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानवाढीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून दाना केअर फाऊंडेशन मार्फत वृक्षारोपण करण्यात आले व त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले. शिनोळी खुर्द, कार्वे, सोनारवाडी, शिनोळी बुद्रुक या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. दाना कंपनीचे सीएसआर अधिकारी पांडुरंग पाटील व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून ४५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

              यावेळी अनंत पाटील, ज्ञानेश्वर बोंगाळे, संदिप पाटील, दत्तात्रय पाटील, संबंधित गावातील सरपंच व सदस्य तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा होता. सर्वांनी आपल्या परीसरात लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची हमी दिली.त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा केली. 

No comments:

Post a Comment