![]() |
शोभा नावलगी यांना निवडीचे पत्र देताना पदाधिकारी. |
बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा
किणी (ता. चंदगड) येथील शोभा नावलगी यांची कोल्हापूर जिल्हा नाभिक महिला कार्यकारिणीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे चंदगड तालुका नाभिक समाज व चंदगड तालुका नाभिक पतसंस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व प्रशस्तिपत्र देवून अभिनंदन करण्यात आले. यापूर्वीही कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी म्हणून सेवा दिली आहे. तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत असतात. किणी गावात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment