सरोळी येथे ८३ लाखांच्या विकासकामांचे २८ ला होणार उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2022

सरोळी येथे ८३ लाखांच्या विकासकामांचे २८ ला होणार उद्घाटन

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          सरोळी (ता. गडहिंग्लज) येथे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ८३ लाखांच्या विविध विकास कामांचे उदघाटन संपन्न होणार आहे.

        सरोळी येथे नळ पाणी पुरवठा, अंगणवाडी व विविध विकास कामांचे उद्घाटन बुधवार दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, जि. प. सदस्य हेमंत कोलेकर, माजी पं. स. उपसभापती विद्याधर गुरबे, गटविकास अधिकारी शरद मगर, सहा गटविकास अधिकारी आनंदा गजगेश्वर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन सरोळी ग्रामपंचायतीचे सरपंच मारूती पाटील, उपसरपंच प्रभाकर पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.

No comments:

Post a Comment