शर्यतींचा बादशहा नाग्या बैल, त्याची एक्झीट मनाला चटका लावून गेली - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2022

शर्यतींचा बादशहा नाग्या बैल, त्याची एक्झीट मनाला चटका लावून गेली

 


बेळगाव/प्रतिनिधी :--

 वडगाव (ता.जि.बेळगाव) येथील बैलगाडी शर्यतप्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांच्या ' नाग्या ' या बैलाचे आज (दि. १८) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले . कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत बेळगावचा डंका पिटणाऱ्या नाग्या बैलाच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे . वडगाव स्मशानभूमीत त्याच्यावर आज ( दि . १८ ) सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत . २१ वर्षांपूर्वी ' १ लाख ६२ हजार रुपयांना खरेदी वडगाव येथील बैलगाडी शर्यतप्रेमी कै . परशराम मल्लाप्पा पाखरे यांनी २१ वर्षांपूर्वी ' नाग्या ' बैलाला १ लाख ६२ हजार रुपयांना अंकलगी येथून खरेदी केले होते . नाग्याने आपल्या जीवनातील पहिली शर्यत अनगोळ येथे खेळली . या पहिल्याच शर्यतीत त्याने पहिला क्रमांक पटकावला . त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही . तब्बल ५०० हून अधिक शर्यती जिंकत तो शर्यतीमधील हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला . नाग्या शर्यतीत उतरला की त्याच्याभोवती लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे कडे निर्माण व्हायचे . शर्यत प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेला नाग्याने आज साऱ्यांचा निरोप घेतला . कारभार गल्ली , वडगाव येथील मारुती परशराम पाखरे व संजय परशराम पाखरे यांच्या निवासस्थानाहून दुपारी दोनच्या सुमारास नाग्याची अंत्ययात्रा काढून सायंकाळी ६ वाजता वडगाव येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बैलगाडी शर्यतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या नाग्याने आपल्या ह्यातीत ५०० हून अधिक शर्यती जिंकल्या होत्या. त्याने केवळ पाखरे कुटुंबीयांचेच नव्हे , तर बेळगाव जिल्ह्याचे नाव लौकिक केले होते.


No comments:

Post a Comment