चौकशीला सामोरे जा, पण आमच्या प्रश्नांची उत्तरे जाहीर करा ! शिनोळी बुद्रुक सरपंच यांना विरोधक ग्रामस्थांचे आव्हान! - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2022

चौकशीला सामोरे जा, पण आमच्या प्रश्नांची उत्तरे जाहीर करा ! शिनोळी बुद्रुक सरपंच यांना विरोधक ग्रामस्थांचे आव्हान!

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      शिनोळी बु. (ता चंदगड) ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा, असे निवेदन ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असता सरपंच नितीन पाटील यांनी चौकशीला सामोरे जावू, असे सांगत आपण चाळीस वर्षानंतर खूप परिवर्तन केले आहे, असे सांगितले जात असले तरी चौकशीनंतर मनमानी कारभार उघडकीस येणार असून सरपंचांनी प्रथम आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान विरोधकांनी दिले आहे.

        ४० वर्षात कधी झाली नव्हती एवढी दुरावस्था गावच्या रस्त्याची झाली आहे, वर्षात साधा खड्डा बुजवला आहे का? आणि निवडणूक तोंडावर आल्यावर गावच्या लोकांना विश्वासात न घेता काही लोकांच्या सह्यांनी लाखो रुपयांचे काम ऐन पावसात सुरु करत आहात, हे योग्य आहे का? आमचा विरोध कदापीही रस्त्याला नाही, पावसात का? गावच्या चार हि अंगणवाडी भाडोत्री खोलीत का? प्राथमिक शाळेचे दोन वर्ग मंदिरात का बसतात? ग्रामपंचायत कार्यालय हायटेक करण्यापेक्षा शैक्षणिक सुविधा का पुरवल्या नाहीत? प्राथमिक शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह आहे का? मागासवर्गीयांचे अनुदान कोठे खर्च केला? शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र आपल्या गावात का झाले नाही? जि. प. सदस्य अरुण सुतार यांनी हायमास्क दिवा, शाळा दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची विकासकामे गावासाठी केली आहेत. लाईट बिल थकीत का? सार्वजनिक वाचनालय जवळील मोरी बांधायला अडचण काय? अॅटलास कंपनीने स्वच्छतेसाठी दिलेल्या साधनसामुग्रीचे काय झाले? ग्रामपंचायत निवडणूक समोर असल्याने राजकीय डाव साधत लोकांची दिशाभूल करून पारदर्शी असणाऱ्या संस्थाच्या निवडणूक लावून कोणाचे हीत जपोसले जात आहे? 

     दहा वर्षापूर्वी जमलेल्या देवस्थान जमिनीच्या ६ लाखाच्या करातून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून 30 लाख रुपयांचे कल्मेश्वर मंदिर उभा केले आहे, आपण सत्तेवर आल्यावर अजूनही स्थानिक देवस्थान कमिटी का नेमली नाही? या ५ वर्षातील जमीन लिलावातून मिळालेला गावचा लाखो रुपयांचा कर स्वतः सरपंच आणि उपसरपंच यांच्या कडून गैरवापर सुरू आहे? या निधीतून गावचे एखादे मंदिर का बांधले नाही ? गावची देवस्थान कमिटी नेमा, आम्ही जमाखर्च, लेखी तपशील, देवस्थान कमिटी अध्यक्ष व खजिनदार यांच्याकडे सुपूर्द करतो. ० ९ /०९ / २०१ ९ च्या ग्रामसभेत जमा खर्च तपशील लोकांच्या समक्ष जाहीर केला होता, मग गेली ४ वर्ष आपण गप्प का बसला होता? गावचे सरपंच यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचा जमा - खर्च तपशील जाहीर करावा, असे आवाहन रवींद्र रेडेकर यांनी केले आहे. सरपंचानी चार वर्षात खूप विकासकामे केली असती तर शेवटच्या घटकेला समाजमंदिर, गावाअंतर्गतचा रस्ता आणि शाळा खोली निव्वळ राजकीय हेतूने कामे सुरु केली आहेत. वाढवलेला उत्पन्न कर हे कोणासाठी लावला? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे म्हटले आहे. या निवेदनावर दयानंद रेडेकर, नागेश मेणशे, नामदेव बोकमूरकर, मोनापा पाटील, शेखर पाटील आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment