![]() |
संग्रहित छायाचित्र |
जालना : सी. एल. वृत्तसेवा
राज्यात सध्या धुमाकूळ घातलेल्या लम्पी स्किन आजाराने आता सर्वच जिल्ह्यात शिरकाव केला आहे. गाय, बैल यासारख्या पाळीव प्राणी 'लम्पी स्कीन' या साथीच्या रोगाने दगावत आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर अति तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असून राज्यातील सर्व जिल्ह्यांत लसींचा साठा उपलब्ध करून पशुधनाला राज्यव्यापी मोफत लसीकरण मोहीम राबवावी. अशी मागणी प्रगतशील शेतकरी हर्षल पाटील फदाट (ता. जाफराबाद, जिल्हा जालना) यांनी पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तहसील कार्यालय जाफ्राबाद यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे आधीच पिचलेल्या राज्यातील शेतकऱ्याला कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी, गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वारे अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी उसनवारी केली. त्यात आता लंपी स्किन या महाभयानक साथीच्या आजाराची भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
लाखो रुपये किंमतीची गाय, बैल, म्हैस आदी जनावरे या रोगामुळे हाहा म्हणता धाराशाही होत आहेत. याला आवर घालण्यासाठी राज्यव्यापी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात यावी. अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी राधाकृष्ण विखे पाटील (पशुसंवर्धन मंत्री) यांच्याकडे केली आहे.
No comments:
Post a Comment