कोवाड महाविद्यालयात मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भरमूअण्णा पाटील सचिन बल्लाळ आदी मान्यवर. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त कोवाड (ता. चंदगड) येथील रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ नेते भरमूअण्णा पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
चंदगड तालुका भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोवाड येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कामी अर्पण ब्लड बँक कोल्हापूर व महाविद्यालयाचे सहकार्य लाभले. उद्घाटन प्रसंगी भरमूअण्णा यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, माजी सभापती यशवंत सोनार, वाय बी. पाटील, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अशोक कदम, अनिल शिवनगेकर, गणपत पाटील (मलतवाडी), लक्ष्मण यादव (कोवाड), भावकू गुरव (राजगोळी बु.), भरमू पाटील (कालकुंद्री), सागर पाटील (निटूर), प्रताप सूर्यवंशी, जानबा चव्हाण, सागर सोनारभावकू गुरव ,अमर नाईक यांच्यासह चंदगड तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. कला महाविद्यालयातील विद्यार्थी, भाजप कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून मोदींना ७२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment