सरोळी येथून प्रतिक कोले बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2022

सरोळी येथून प्रतिक कोले बेपत्ता

प्रतिक अशोक कोले

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

        सरोळी (ता. गडहिंग्लज) येथून कु. प्रतिक अशोक कोले (वय - २५) सध्या राहणार कला रेसिडन्सी करसवाडा, म्हापसा गोवा हा दि. १४  सप्टेंबर २०२२ पासून सरोळी येथील राहत्या घरातून बेपत्ता झाला. यासंदर्भातील  नेसरी पोलिसात  फिर्याद प्रतिकची आई श्रीमती कल्पना अशोक कोले यांनी दिली आहे.

        प्रतिकची उंची ५ फूट ५ इंच आहे. अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, चेहरा उभट, केस काळे, नाक सरळ, उजव्या हाताला मनगटाजवळ गोंदवलेले, अंगात पिवळ्या रंगाचे जॅकेट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. मराठी, कोकणी, हिंदी व इंग्रजी भाषा बोलतो. प्रतिक हा गोव्याला जातो असे सांगून गेला. पण तो गोव्यालाही गेला नाही आणि गावीही परत आला नसल्याने हरवल्याची तक्रार दाखल झाली आहे. अधिक तपास सहा पो. निरिक्षक प्रशात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. भोसले करत आहेत.

No comments:

Post a Comment