शिप्पूर येथील संतू पाटील ५ वर्षापासून बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2022

शिप्पूर येथील संतू पाटील ५ वर्षापासून बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल

संतू पाटील

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

           शिप्पूर (ता. गडहिंग्लज) येथून संतू भिमा पाटील (सध्याचे वय ५५ वर्षे) हे सन ऑक्टोबर २०१९ पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा साहिल संतू पाटील यानी नेसरी पोलिसात दिली आहे.

           दारूच्या नशेत संतू पाटील घरातून कोणालाही न सांगता निघून गेले असून अद्याप ते परत न आल्याने बेपत्ता असल्याची फियार्द देण्यात आली आहे. त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे - ५ फूट ६ इंच उंची, अंगाने मध्यम, रंगाने गोरा, चेहरा उभट अशा वर्णनाची व्यक्ति कोणाला आढळल्यास नेसरी पोलीस स्टेशनशी किंवा ०२३२७-२२७१३३ या नंबरवर संपर्क साधण्याचे  आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment