सत्य व अहिंसेचे उपासक साम्राज्यवाद्यांचे स्मृतिस्थान गांधी हा भारतीयांचा अमूल्य ठेवा - माजी प्राचार्य आर. आय. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2022

सत्य व अहिंसेचे उपासक साम्राज्यवाद्यांचे स्मृतिस्थान गांधी हा भारतीयांचा अमूल्य ठेवा - माजी प्राचार्य आर. आय. पाटील

गांधी जयंतीनिमित्त दिपप्रज्वलन करताना माजी प्राचार्य आर. आय. पाटील, प्राचार्य डाॅ. पी. आऱ. पाटील, प्रा. संजय पाटील व प्रा. ए. डी. कांबळे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा व स्टाफ अॅकॅडमीच्या वतीने आज  2 ऑक्टोबर 2022 हा दिवस महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा जयंती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी व जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. व्ही. के. गावडे यांनी करून दिला. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.   

              गांधीजींचे विचार व कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. गांधीपर्व अजूनही नव्या पीढीला समजून घेणे जरुरीचे आहे, कारण सत्य व अहिंसेच्या बळावर राजकारणाची मुहूर्तमेढ रोवणारा शांततेचा पुरस्कर्ता, साम्राज्यवादी देशांचे स्मृतिस्थान गांधी यांच्या कर्तृत्वाची ओळख आपल्याला होणे, काळाची गरज असल्याचे मत दि न्यू इंग्लिश स्कूलचे माजी प्राचार्य आर. आय. पाटील यांनी व्यक्त केले. 

         ते र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती आणि प्लास्टिकमुक्त परिसर अभियान कार्यक्रमात बोलत होते.

      श्री. पाटील पुढे म्हणाले, ``गांधीजींच्या मोहनदास ते महात्मा, राष्ट्रपिता व बापू या महान चरित्राचा जीवनपट उलगडून सांगताना म्हणाले की  अहिंसा, सत्य, सत्याग्रह या त्रिसूत्रीने गांधीजींचे जीवन व्यापले होते. द. आफ्रिका, इंग्लंड, भारत, इंडोनेशिया अशा विविध देशांमध्ये गांधींनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. स्वातंत्र्य लढ्यातील बरे वाईट अनुभव, विविध आंदोलने, गोरगरिबांवर होत असलेले अन्याय-अत्याचार, शेतसारा व गरिबांचे लूट या विरोधात गांधी जीवनभर लढत राहिले. चले जाव चळवळीच्या माध्यमातून देशातून इंग्रजांना बाहेर घालून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या महान नेत्याच्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. अस्पृश्यता निवारण, सर्वधर्मसमभाव, शांततेच्या मार्गाने सत्याग्रह व गुलामगिरीतून मुक्ती करून लढा यशस्वी करून दाखविला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा या थोर महात्म्याला वर्तमान पीढी विचारांच्या माध्यमातून अवश्य जाणून घेईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.``

     स्वतंत्र्य भारताचे दुसरे पंतप्रधान ' मूर्ती लहान पण कीर्ती महान ' अशा ब्रीदने ज्याना ओळखले जाते ते लालबहादूर शास्त्री यांची ओळखही त्यांनी केलेल्या समानता, श्वेतक्रांती, किसानोद्धार, भारत-पाकिस्तान शांततेसाठीचा ताश्कंद करार अशा कार्यातून करवून दिली. स्वतः प्रचंड गरिबीतून शिक्षण घेत इमानदारी आणि प्रामाणिकतेच्या बळावर देशाच्या विकासाची गंगा वाहती ठेवली व स्वकर्तृत्वाने समाजाला नवी दिशा दिली त्या थोर नेत्याची जाण युवा पिढीने ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.``

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या दोघांच्याही क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला. राजकीय स्थित्यंतरे, लढ्यातील घडामोडी आणि वर्तमान राजनीती यावर त्यांनी विस्तृत भाष्य केले. धर्मांध व चुकीच्या मार्गाने चाललेल्या राजनीती व देशाच्या वर्तमान वाटचालीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. युवा पिढीने निधर्मी व निर्भीड बनून; शांति, प्रेम, अहिंसा, सत्य या गांधीजींच्या तत्त्वानुसार विश्वबंधुत्वाच्या भावनेने चालण्याचा व विज्ञाननिष्ठ बनण्याचा अटोकट प्रयत्न करावा अशी आशा व्यक्त केली.

    गांधी सप्ताहाच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान व प्लास्टिक मुक्त परिसर या शीर्षकांतर्गत हा सप्ताह साजरा केला जात  आहे. प्रा ए डी कांबळे, मेघा हाळवणकर, भावना बाळप्पा यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेनिफर डिसोजा यांनी केले तर आभार प्रतीक्षा नाटलेकर यांनी मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस. एस. समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment