देशाला महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज - प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2022

देशाला महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज - प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी

म गांधी जयंतीनिमित्य बोलताना प्राचार्य व्ही .एन. सुर्यवंशी


अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

           सत्य, शांती आणि अहिंसा यांचा योग्य उपयोग करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यानी  देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अलिकडच्या काळात भ्रष्टाचार, अन्याय, हाणामारी आदि कारणाने महात्मा गांधीचे विचार बाजूला पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याबरोबर नागरिकांचे हीत साधायचे असेल तर पुन्हा या देशाला महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज असल्यचे मनोगत प्रार्चार्य  व्ही. एन. सुर्यवंशी यानी व्यक्त केले.

           श्री शिवशक्ती हाय. व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे आयोजित महात्मा गांधी आणि लालबहाद्द् शास्त्री जांयती कार्यक्रमात प्राचार्य श्री. सुर्यवंशी बोलत होते.

      यावेळी म गांधी व लालबहाद्द् शास्त्री प्रतिमेचे पुजन शालेय मंत्रिमंडळ सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्याबरोबरच प्रा. व्ही. पी. पाटील, एस. एन. पाटील, जे. व्ही. कांबळे, श्री. तेली यानी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला  एस. डी. पाटील, एस. के. पाटील व्ही. बी. गावडे आदिजन व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. के. पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment