चंदगड र. भा. माडखोलकर महाविद्यालयात, वाणिज्य व व्यवस्थापन फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात निलया फाऊनडेशन पूणे संस्थेचे संपर्काधिकारी महेंद्र म्हस्के, प्राचार्य डाॅ. पाटील व इतर |
चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
जीवनातील कोणतेही यश हे बसल्या जागी आपोआप किंवा योगायोगाने मिळत नाही. त्यासाठी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर व्यूहरचनात्मक पद्धतीने अविश्रांत मेहनत करण्याची गरज असते, असे प्रतिपादन पूणे येथील निलया फाउंडेशन ट्रस्ट या संस्थेचे संपर्काधिकारी महेंद्र म्हस्के यांनी केले. चंदगड र. भा. माडखोलकर महाविद्यालयात, वाणिज्य व व्यवस्थापन फोरमच्या वतीने आयोजित "सक्सेस मंत्रा: बुद्धिमत्ता आणि कौशल्ये" (Success Mantra: Intelligence & Skill) या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा उद्देश विशद केला. श्री. मस्के पुढे म्हणाले ``प्रत्यक्षात कोणतीही अनुकूलता नसताना आपल्या बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेच्या जोरावर असामान्य काम करण्यातून आपले यश सिद्ध होते, असे सांगून त्यांनी सक्सेस मंत्राबाबत विद्यार्थ्याकरवी गेम्स सादर केले.``
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील म्हणाले, यशाचा कोणताही शॉर्टकट मार्ग नसतो. आत्मविश्वासाच्या जोरावर दृढनिश्चयाने संकटाचे रूपांतर संधीमध्ये करण्यात यशाचे खरे इंगित दडलेले असते. त्यासाठी स्वतःला सिध्द करावे लागते. यावेळी शेखर बेरडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सदर कार्यशाळेत प्राध्यापकांसह वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाचे १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. तर डॉ. एस. एस. सावंत यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment