आमदार राजेश पाटील सिलाई वल्ड चे फित कापून शुभारंभ करताना सोबत कल्लाप्पा भोगण , दयानंद सलाम |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
सध्याचे युग हे फॅशनचे युग आहे. फॅशनवरूनच व्यक्तिची ओळख होते. दयानंद सलाम या उद्योजकाने सुरू केलेल्या सिलाई वल्ड मुळे कोवाडच्या वैभवात भर पडली असल्याचे मनोगत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
कोवाड (ता. चंदगड) येथे दयानंद सलाम यानी नामांकित कंपनिच्या तयार कपड्यांच्या ' सिलाईवल्ड 'शोरूमचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
यावेळी सिलाई वल्डचे अध्यक्ष दादासाहेब गुजर, बिझनेस हेड संजय चौधरी कोवाड सरपंचा सौ. अनिता भोगण आदिजन प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे बोलताना म्हणाले, कोवाड बाजारपेठेने परिसरातील सर्व ग्राहकाना अत्यल्प दरात चांगली सेवा उपलब्ध करून द्यावी. बाजारपेठेत होणारे अतिक्रमण थांबवावे म्हणजे वाहतूकीचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी ग्रामपंचायतीने व व्यापारी संघटनेने नियोजन करण्याचे आवाहनही आमदार पाटील यानी करून सलाम कुंटूंबियांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. दिपक पाटील, बळीराजा संघटनेचे नितिन पाटील यानी मनोगते व्यक्त केली. यावेळी घुल्लेवाडीच्या लेझिम पथकाने बहारदार लेझिमचे सादरिकरण केले. कार्यक्रमाला कोवाड व्यापारी संघटना तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत दयानंद सलाम यानी केले. सूत्रसंचालन सुभाष बेळगावकर यांनी केले तर आभार दिनकर सलाम यांनी मानले.
No comments:
Post a Comment