सन २०२२-२३ हंगाम करिता शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत होणाऱ्या भात खरेदी साठी नोंदणी चंदगड तालुका कृषिमाल फलोत्पादन सह. ख. वि. संघ दाटे संघातर्फे दि.४ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन उदयकुमार देशपांडे यांनी दिली.
चंदगड तालुक्यात भात व नाचणा पीक मोठया प्रमाणात घेतली जातात. या पीकाला शासनाच्या आधारभूत योजनेंतर्गत किंमत मिळवी यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करतेवेळी चालु वर्षाचा पीक नोंद असलेला ७\१२ उतारा ८ अ उतारा आधार कार्ड, बॅँक पास बुक आवश्यक आहे. नोंदणी दि. १५ ऑक्टोबर 2022 पर्यंत संघ कार्यालय दाटे येथे केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment