सुमित्रा बाबासाहेब देसाई |
चंदगड / प्रतिनिधी
शिरोली (ता. चंदगड) येथील रहिवासी
सौ. सुमित्रा बाबासाहेब देसाई (वय वर्ष ७५) यांचे काल रविवार दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शिरोली (ता. चंदगड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या दौलतचे माजी संचालक बाबासाहेब विठ्ठलराव देसाई यांच्या पत्नी, राष्ट्रीय काँग्रेसचे चंदगड तालुकाध्यक्ष संभाजीराव बाबासाहेब देसाई व माजी जि. प. सदस्य तात्यासाहेब बाबासाहेब देसाई यांच्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment