तुर्केवाडी येथील महादेवराव बी.एड. कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2022

तुर्केवाडी येथील महादेवराव बी.एड. कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

 


चंदगड / प्रतिनिधी 
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव बी.एड. कॉलेजमध्ये शनिवार दि.१५ऑक्टोबर हा दिन  भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य एन.जे. कांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागप्रमुख प्रा.ग.गो.प्रधान हे होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.
'यशस्वी जीवनासाठी वाचन हे विधार्थ्यांनी अविभाज्य अंग बनवा .तसेच डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी वाचन संस्कृती टिकवणे आवश्यक आहे '. असे प्रतिपादन मार्गदर्शक प्रा.ग.गो.प्रधान यांनी केले.
अध्यक्ष प्र.प्राचार्य कांबळे यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी प्रसंग सांगून वाचनाचे महत्व अधोरेखित केले.गाव तेथे ग्रंथालय करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून वाचनासाठी प्रोत्साहन देण्याचे आव्हान त्यांनी प्रशिक्षणार्थीना केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त यावेळी प्रशिक्षणार्थीनी  बनविलेल्या भीतीपत्रकांचे उदघाटन पॉलिटेक्निक कॉलेज चे प्रमुख एस. पी. गावडे यांनी केले.तर विद्यार्थ्यासाठी 'ग्रंथ प्रदर्शन' आयोजन केले याचे उद्घाटन ग्रंथपाल श्री व्ही. पी. गुरव  व सहाय्यक ग्रंथपाल  परशराम काजिर्णेकर यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रा.पोतदार अभिषेक ,संस्थाध्यक्ष  महादेवराव वांद्रे ,अधीक्षक श्रीम.एस आर.देशपांडे,प्रा.सचिन कांबळे, प्रा.श्रीम.पी. पी. कदम,प्रा.मनीषा सोहनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी  तुकाराम नाईक यांनी केले तर आभार मिराताई चौगुले यांनी मानले.


No comments:

Post a Comment