चंदगड येथे चंदगड अर्बन चषक २०२२ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दिपावलीनिमित्त आयोजन, ७१ हजार प्रथम बक्षिस, कधी होणार स्पर्धा.....वाचा..... - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2022

चंदगड येथे चंदगड अर्बन चषक २०२२ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दिपावलीनिमित्त आयोजन, ७१ हजार प्रथम बक्षिस, कधी होणार स्पर्धा.....वाचा.....

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          येथील चंदगड अर्बन बँकेच्या वतीने भव्य फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२२  पासून चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी मर्यादित १० षटके असून प्रवेशासाठी ५ हजार रुपये शुल्क आहे. केवळ ३२ संघांना प्रवेश दिला जाणार आहे. 

      स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी ७१ हजार रु. दि चंदगड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक यांच्या वतीने, दुतीय क्रमांकासाठी ४१ हजार रु. आई-आबा फाउंडेशनच्या वतीने, तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये फिरोज मुल्ला उपनगराध्यक्ष यांच्या वतीने, चतुर्थ बक्षीस ११ हजार रुपये मारुती कुंभार यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.

            तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी ३००१ रुपये अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन यांच्या वतीने, मॅन ऑफ द मॅच ३००१ संतोष वनकुंद्रे यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाज यासाठी ३००१ व व उत्कृष्ट गोलंदाज ३००१ ही दोन्ही बक्षिसे चंदगड अर्बन बँकेच्या वतीने देण्यात येणार आहे. 

        स्पर्धेतील संघांना अगोदर १५ खेळाडूंची यादी आधार कार्ड व फोटो देणे बंधनकारक असेल. काही कारणास्तव सामन्यात व्यत्यय आल्यास सामना आहे त्या परिस्थितीत खेळवला जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा.

         इच्छुक संघाने विनायक पिळणकर (९४२१२८७८०७) यांच्यासह नौशाद मुल्ला (९४२१२०५५७६), जोतिबा (९९८३६७७८७४) व हिदायत (८९७५१३४९५२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बँकेच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment