![]() |
| श्रेया राजाराम पाटील |
चंदगड: सी. एल. वृत्तसेवा दि. ०१-०१-२०२६
जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर, अलबादेवी येथील विद्यार्थिनी कु. श्रेया राजाराम पाटील हिने कथाकथन विभागात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून देदीप्यमान यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत श्रेयाने आपल्या कथाकथनातून उपस्थित रसिकांची आणि परीक्षकांची मने जिंकली. तिची शब्दांवरील पकड, प्रभावी शब्दफेक आणि कथेतील प्रसंगानुसार बदलणाऱ्या तिच्या चेहऱ्यावरील भावना यामुळे तिचे सादरीकरण अत्यंत जिवंत झाले होते. कथेतील प्रत्येक चढ-उतार तिने आपल्या आवाजातील बदलातून अत्यंत प्रभावीपणे मांडला. ज्यामुळे तिला जिल्ह्याचे अव्वल स्थान प्राप्त झाले.
लाल मातीतील या ग्रामीण कन्येने आपल्या कलेच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे अलबादेवी गावचे आणि विद्या मंदिर अलबादेवी शाळेची चंदगड तालुक्याचे नाव जिल्ह्यात उंचावले आहे. श्रेयाला तिचे आई वडील शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


No comments:
Post a Comment