राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत 'चंदगडी कलाकारांनी 'मिळवली कौतुकाची थाप - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2025

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत 'चंदगडी कलाकारांनी 'मिळवली कौतुकाची थाप


चंदगड / सी एल वृत्तसेवा

      मनोरंजन मंडळ इचलकरंजी आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत चंदगडच्या 'चंदगडी कलाकार 'या ग्रुपने संजय गोविलकर लिखित, रोशन कुंभार दिग्दर्शीत 'कुणासाठी....? कश्यासाठी.....? ही एकांकिका सादर केली.यापूर्वी रंगमंच्यावर पाऊल देखील न ठेवलेल्या या नवोदित कलाकारांनी प्रेक्षकवर्गाच्या  हृदयाचा ठाव घेत टाळ्या आणि कौतुक मिळवण्यात यश संपादन केल.



       कधी कधी कलेची आवड असून संधी मिळत नाही किंवा साथ मिळत नसल्याने ग्रामीण भागातील कलाकार नेहमीच मागे राहतात. अशा नवोदित कलाकारांना घेऊन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न

      आजऱ्याचे रोशन कुंभार नेहमीच करतात. कुणासाठी....? कश्यासाठी....? ही एकांकिका. या नवोदित कलाकारांसाठी खूप जड, पेलायला कठीण जाणारा विषय होता. तरी देखील हाच विषय निवडण्यामागे दोन कारण आहेत असं रोशन कुंभार म्हणाले 

, एक म्हणजे असं काही करताना स्त्री-पुरुष कलाकारांची कमतरता भासते. दुसरं म्हणजे की एकांकिका फक्त स्त्री पात्रांची असल्याने आम्हांला ही पात्र उपलब्ध झाली. त्यासाठी सुद्धा खूप शोधाशोध करावा. म्हणून आम्हीं ही संहिता निवडली. नवीन कलाकार कायमचे घडवायचे असतील तर त्यांना हलक्या स्वरूपाची संहिता (स्क्रिप) घेऊन आदी हलक नंतर कठीण असं न करता जड संहिता हताळायला लावल्याने कलाकारांची ताकत दिसून येते आणि त्यांनादेखील अभिनय नेमका किती वरच्या थराला न्यावं लागतो याची जाणीव होते. यासाठी हा प्रयत्न केला असल्याच आणि हा प्रयत्न सफल झाल्याचं देखील कुंभार यांनी सांगितलं. सादरीकरणानंतर भेटायला आलेल्या कलाकारांना 'युवा कलाकारांचा उत्स्फूर्त अभिनय सादरीकरण' अशी कौतुकाची थाप प्रेक्षकांनी दिली. यापुढे देखील यांनी अशीच घोडदौड सुरु ठेवली तर  यशाचा झेंडा फडकवायला वेळ लागणार नाही आणि हे कलाकार हे नक्कीच करून दाखवतील अशी आशा दिग्दर्शकाने व्यक्त केली. यातील नैपथ्य-अजय सातार्डेकर, पांडुरंग कुंभार, प्रकाशयोजना-रोशन कुंभार, संगीत-दिया सावंत, रंगभूषा-त्रिवेणी कांबळे, वेशभूषा-कोमल कणबरकर,वैष्णवी बांदेकर, कलाकार - कोमल कणबरकर, वैष्णवी बांदेकर, निर्जला नाईक, जयराज देसाई, संतोष नाईक, सायली चव्हाण, शिवानी कांबळे, चंदना कांबळे, योगिता कनबरकर, साक्षी कांबळे हे कलाकार यात सहभागी होते.

No comments:

Post a Comment