कोवाड महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2022

कोवाड महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यलयात शिवराज महाविद्यालय अग्रणी योजने अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एस. पवार  होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती संस्था सचिव एम. व्ही. पाटील यांची होती.

       प्रमुख वक्ते प्रा. व्ही. के. गावडे र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड, डॉ. डी. एन. वाघमारे घाळी कॉलेज गडहिंग्लज  यांनी "आभाशी चलन: वास्तव आणि आव्हाने" याविषयावर  मार्गदर्शन केले. यावेळी चंदगड आजरा गडहिंग्लज क्लस्टर मधील प्राद्यापक विघार्थी सहभागी झालेले होते.कार्यक्रमाचे उदघाटन सचिव एम. व्ही. पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी आभासी चलन् ही संकल्पना नवीन आहे ते समजून घेणे गरजेचे आहे. काळाप्रमांणे आपण सर्व गोष्टींचा स्वीकार करणे आजची गरज आहे. डॉ. व्ही. आर. पाटील,   डॉ. ए. के. कांबळे, प्रा. एस. जे. पाटील,  डॉ. ए. एस. आरबोळे, डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. के. पी. वाघमारे, प्रा. मुकेश कांबळे, डॉ. सदानंद गावडे, डॉ. एस. बी. पाटील आदिजन उपस्थित होते. 

           प्रास्ताविक प्रा. शीतल मंडले यांनी स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. व्ही. के. दळवी यांनी करून दिला. कार्यशाळा दोन सत्रात झाली. सपहिल्या सत्राचे प्रा. एस. जे. पाटील तर डॉ. व्ही. आर. पाटील हे दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे केले. बी.ओ एस पदी निवडणूक लढवून विजयी झालेले इंग्लिश विभागाचे प्रमुख डॉ. ए. एस. आरबोळे यांचा सचिव एम. व्ही. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment