यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत दौलत प्राथमिक शाळेत 'बालदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2022

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत दौलत प्राथमिक शाळेत 'बालदिन साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत बालदिनानिमिल दौलत प्राथमिक शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दौलत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक धनाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप सावंत, सदस्या सौ. गावडे, सौ. ओऊळकर आदी उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख प्रा. पी. ए. पाटील यांनी केले तर स्वागत प्रा. डॉ. आय. आर. जरळी यांनी केले. तसेच बालदिनाचे महत्व आपल्या मनोगतात विषद केले. यावेळी सर्वांचे स्वागत पुष्पगुच्च देवून करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयातील इंग्रजी विभागाकडून पहिली ते चौथी पर्यंत च्या सर्व मुलांना  वही आणि पेन, पुस्तके भेट  देण्यात आली. मुलांनी आनंद व्यकत केला. तसेच गोड, खाऊ देऊन बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वांनी बालचमुच्यामध्ये रममान होवून हा दिवस साजरा केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्या मध्ये मिसळून बालपण अनुभवायला मिळाले बददल सर्वांनी समाधान व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक धनाजी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी.  अजळकर, प्रा. पी. ए. पाटील, प्रा. डॉ. आय. आर. जरळी आदीनी बालदिनानिमित आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी दौलत प्राथमिक शाळेचे अध्यापक प्रकाश पाटील, बालाजी गिरी, इंग्रजी विभागाच्या विदयार्थीनी, शाळेचे सर्व चिमुकले विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. सुवर्णा पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment