पारगड नजीक वाकलेल्या धोकादायक विद्युत पोलकडे वीज कंपनीचे दुर्लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2022

पारगड नजीक वाकलेल्या धोकादायक विद्युत पोलकडे वीज कंपनीचे दुर्लक्ष

पारगड- नामखोल रस्त्यालगत धोकादायकरिता वाकलेला विजेच्या खांब.


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     किल्ले पारगड (ता चंदगड) ते नामखोल रस्त्यालगत जंगलात धोकादायकरित्या वाकलेल्या विद्युत पोलकडे विज कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. पारगड पासून अलीकडे जांभळीचे वळण रस्त्याजवळ हा विजेचा खांब गेल्या काही दिवसापासून पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेत आहे.

          विद्युत प्रवाह सुरू असलेल्या या खांबाच्या तारा जमिनीपासून केवळ तीन फूट अंतरावर आहेत. त्यामुळे जंगली प्राणी किंवा जंगलात चारण्यास सोडलेल्या गाय, म्हशींचा या तारांना सहज स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे अशा प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पारगड व परिसरात जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण सेल्फी पॉईंट असल्याने किल्ल्यावर जाताना किंवा येताना बरेच पर्यटक या ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबतात. काही अतिउत्साही पर्यटक जंगलात उतरतात. जंगलातील झाडांना या प्रवाहित तारा चिकटल्यामुळे विद्युत प्रवाह जंगलात पसरू शकतो. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी खांब पूर्ववत उभा करावा अशी मागणी करुनही कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी पारगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पर्यटकांतून करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment