हलकर्णी महाविद्यालयातील आदर्श माजी विद्यार्थी संघाला वि‌द्या भादवणकर-थोरात यांचेकडून ५१००० रुपयांची देणगी - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2022

हलकर्णी महाविद्यालयातील आदर्श माजी विद्यार्थी संघाला वि‌द्या भादवणकर-थोरात यांचेकडून ५१००० रुपयांची देणगी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी दौलत विश्वस्थ  संस्थेच्या यशवंतराव चहाण महाविद्यालयात आदर्श माजी विद्यार्थी संघ कार्यरत आहे या संघाचे कार्य महाविद्यालयाच्या वाटचालीत महत्वाचे आहे बेळगाव येथे स्थित असणाऱ्या माजी विद्यार्थीनी विदया भादवणकर - थोरात यांनी आदर्श माजी विद्यार्थी संघाला रु ५१,००० हजाराची  देणगी दिली.  त्यांचे पती रेणुका शुगर्सचे मॅनेजर काशिनाथ थोरात यांनी हि देणगी संघाकडे सुपूर्द केली.

       यावेळी दौलत विश्वस्थ संस्थेचे उपाध्यक्ष तथा आदर्श विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष संजय पाटील, संस्थेचे सचिव विशाल पाटील यांचे हस्ते  काशिनाथ थोरात यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजळकर, नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे, सहसमन्वयक डॉ. जे. जे. व्हटकर, डॉ. अनिल गवळी, कुंदन चौगुले, प्रा.  व्ही. व्ही. कोलकार, डॉ. अर्जुन पिटूक, प्रशांत शेंडे, नंदकुमार बोकडे, बी. बी. नाईक, संदीप पाटील, युवराज रोड, प्रा. एस. एन. पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment