सांबर सदृश्य प्राण्यांची शिकार, दोघेजण ताब्यात, पोलिस व वनविभागाची कारवाई, आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता, कोठे घडली घटना......... - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2022

सांबर सदृश्य प्राण्यांची शिकार, दोघेजण ताब्यात, पोलिस व वनविभागाची कारवाई, आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता, कोठे घडली घटना.........

पकडलेल्या दोन संशयितासोबत पोलिस व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        तुडये कोलिक रोडवर रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांना काही लोक वाहनासोबत संशयितरित्या दिसून आले. त्यांना हटकले असता ते पळून जावू लागले. मात्र पोलिसांनी त्यांना पकडले. त्यातील एका व्यक्तीकडे स्नॅपर रायफल व एका वाहनांमध्ये वन्य प्राण्याचे मास मिळून आले. पोलिसांनी याबाबतची माहीती पाटणेचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांना दिली. ते तातडीने घटनास्थळी हजर झाले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता सांबर सदृश्य प्राण्याचे मास मिळून आल्याने दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी यांचा आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता असून त्याबाबत तपास चालू आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. शहा सैफुद्दीन शमशुद्दीन (रा. बेंगलोर) व चेतन कुमार सुभाष चंद्र अभिगिरी (रा. गदग) अशी पकडलेल्या दोन व्यक्तींची नावे आहेत.

               हि कारवाई पोलीस दलातील संदीप कांबळे, पोलीस नाईक श्री. डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी अत्तर बंद आरोपींना सिताफिने ताब्यात घेतले.. पोलीस विभागाकडून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस शिपाई संदीप कांबळे, पोलीस नाईक डोंगरे, पोलीस शिपाई युवराज पाटील, पोलीस नाईक भदरगे यांनी सहभाग होता. तर वन विभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, एन. एन.  धामणकर (वनपाल तुडिये) बी. आर. भांडकोळी (वनपाल कळसगादे) तांबेकर (वनरक्षक कोलिक) एम. आय. सनदी (वनरक्षक कोलिक), विश्वनाथ नार्वेकर चालक यांनी केली. 

         पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, नितेश खाटमोडे (उपविभागीय पोलिस अधिकारी),  राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस व वन विभागाने संयुक्तरीत्या केली आहे. पुढील कारवाई एसीएफ एन. एस. कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत आवळे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे फाटा हे करत आहेत.

No comments:

Post a Comment