चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत 'मोडी लिपी कोर्सचे उदघाटन करण्यात आले .अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते. प्रास्ताविक व कार्यकमाचा हेतू इतिहास विभाग प्रमुख डॉ. जे. जे. व्हटकर यांनी विषद केला. प्राचार्य अजळकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. बाबली गावडे यांनी आपल्या मनोगतात बोलताना “मोडी लिपीमूळे रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते लुप्त होत असलेल्या कागदपत्रांचे वाचन करून खरा इतिहास प्रकाशामध्ये आणू शकतो.
मोडी लिपी वाचकांची आवश्यकता भासत आहे. असे मत मांडले". उपाध्यक्ष संजय पाटील म्हणाले" विद्यार्थ्यांनी मोडी लिपी कोर्सचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. मोडी लिपीतील कागदपत्रांचे व नाण्यांचे जतन करावे. मोडी लिपीचे वाचन करून नवा इतिहास समाजासमोर अणावा असे सांगितले. मोडी लिपी कोर्ससाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयातील प्राद्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कुमारी माधुरी सुतार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. मधुकर जाधव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment