मांडेदुर्ग येथील भरमाना पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2022

मांडेदुर्ग येथील भरमाना पाटील यांचे निधन


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक भरमाना भैरू पाटील (वय 92) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते गावातील महात्मा फुले विकास सेवा सोसायटीचे 30 वर्षे बिनविरोध चेअरमन होते. तसेच चंदगड तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे माजी संचालक होते. चंदगड तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे विद्यमान संचालक राजाराम पाटील यांचे ते वडील होत. सोमवारी सकाळी रक्षाविसर्जन होणार आहे.
No comments:

Post a Comment