आंतर जिल्हा रिले आणि पोहण्याच्या स्पर्धेत भगतसिंग गावडे सुवर्ण पदकांचा चौकार ठोकत ठरला चॅम्पियन - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2022

आंतर जिल्हा रिले आणि पोहण्याच्या स्पर्धेत भगतसिंग गावडे सुवर्ण पदकांचा चौकार ठोकत ठरला चॅम्पियन



बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

         हुबळी येथील शिवगीरी सोशल क्लबतर्फे घेण्यात आलेल्या आंतर जिल्हा पोहण्याच्या स्पर्धेत भगतसिंग भारत गावडे (वय ७ वर्षे) याने २५ मीटर पोहण्याच्या विविध प्रकारात तब्बल तीन आणि ५० मीटर रिले मध्ये एक अशा चार सुवर्ण पदकांची कमाई करत चॅम्पियनशीप मिळवली. अतिशय लहान वयात भगतसिंग पोहण्याच्या स्पर्धेत धवल यश मिळवत असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      कोरोना काळानंतर पोहण्याच्या सरावात बरेच खंड पडत असताना देखील भगतसिंग याने या स्पर्धेत २५ मीटर अंतर असलेल्या किक बोर्ड, फ्री स्टाईल आणि बॕकस्ट्रोक या तिन्ही प्रकारात प्रत्येकी एक अशी तीन आणि ५० मीटर रिले मध्ये एक अशी एकूण चार सुवर्ण पदके पटकावत त्याने चॅम्पियनशिप मिळवली आहे. सुवर्णपदकांसोबत चॅम्पियनशिप मिळवल्यामुळे त्याला मेडल बॅग, गॉगल, किकबोर्ड टोपी आणि स्विमिंग कॉशुम अशा भेटवस्तूही देण्यात आल्या.

        या अगोदरही पोहण्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कास्य अशी अनेक पदके त्याने पटकावली आहेत. भगतसिंग हा हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील भगतसिंग अॕकॕडमीचे भारत गावडे यांचा चिरंजीव आहे. भगतसिंग याला त्याचे प्रशिक्षक श्री. अजिंक्य, श्री. रोहन, श्री. मंजुनाथ, श्री. अजित, रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर आणि त्याचे मामा वैजनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.



No comments:

Post a Comment