चंदगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भानामतीच्या प्रकारांना ऊत, करंजगाव येथील प्रकार उघडकीस, नेमके काय घडले वाचा सविस्तर..... - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2022

चंदगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भानामतीच्या प्रकारांना ऊत, करंजगाव येथील प्रकार उघडकीस, नेमके काय घडले वाचा सविस्तर.....

करंजगाव येथे घडलेला हा प्रकार

चंदगड / प्रतिनिधी
चंंदगड तालुक्यात ग्राामपंचायतीच्या
प्रचारात पैसे वाटप, शपथा या प्रकाराबरोबरच आता करणी-भानामतीचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर होत असून भोंदूबांबाची सध्या चलती आहे. असाच भानमतीचा एक प्रकार करंजगाव (या. चंदगड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत उघडकीस आला आहे. सरपंच पदासाठी  अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेेेल्या अर्चना अनिल गावडे यांच्या दारात अज्ञातांनी पत्रावळीत गुलालात रंगवलेला नारळ, लिंबू, तांदुळ, काळी बाहुली, काळा दोरा असे साहित्य ठेवले होते.

 त्यामुळे निवडणुकीतील प्रचारापेक्षा या भानामतीच्या प्रकाराचीच जास्त चर्चा सध्या करंजगावासह पंचक्रोशीत चर्चीली जात आहे. या प्रकाराची पोलीस पाटील विवेकानंद गंगाराम पाटील यांनी पाहणी केली आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात असे अंधश्रध्देचे करणी भानामतीसारखे प्रकार घडत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंदगड तालुक्यामध्ये ४० ग्रामपंचायत आणि सरपंच पदांच्या निवडणुका पार पडत आहेत. यापैकी ६ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. गावागावांमध्ये निवडणुकीचे टशन पाहायला मिळतंय. 
स्थानिक पातळीवर लढवल्या जाणाऱ्या या निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी सर्वच उमेदवार व पॅनल मैदानात उतरले आहेत. निवडणुकीमध्ये विजयासाठी अनेक हातखंडे देखील वापरताना पाहायला मिळतंय. प्रत्येकच उमेदवार मतदारराजांना भुरळ घालत आहेत. त्यासाठी वेगळे फंडे वापरले जातायत. मात्र, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात काही अज्ञात समाजकंटक करणी भानामतीसारखे अंधश्रद्धीय प्रकार हे धक्कादायक आहेत. करजंगावमध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक लागली असून अपक्ष उमेदवार गावडे यांच्या दारासमोर हा प्रकार केला आहे. काही अज्ञातांकडून या उमेदवाचा पराभव व्हावा यासाठी ३ बाहुल्या, लिंबु, टाचण्या टोचलेल्या आहेत. नारळ, पाने, खारीक, सुपारी, गुलाल ठेवण्यात आले आहे. याची जोरदार चर्चा पंचक्रोशित गाजत आहे. 


No comments:

Post a Comment